What is tofu similar to paneer?टोफू सारखे दिसणारे पनीर काय आहे
टोफू आणि पनीर हे शाकाहारी खाद्यपदार्थातील दोन लोकप्रिय पदार्थ आहेत, या दोन्ही पदार्थाचा उगम हा जगाच्या विविध भागांतून आणि संस्कृतींमधून झाला आहे तरी ही दोन्ही पदार्थ दिसण्यात आणि चवीला एक सारख्या प्रमाणात दिसू शकतात पण या दोन्ही पदार्था मध्ये काही प्रमाणात आपल्याला भिनता दिसून येते जस की हे पदार्थ बनवण्याची पद्धत त्याच बरोबर ही पदार्थ बनवण्यासाठी लागणारी सामग्री व त्याची चव या मध्ये खूप फरक आहे तसेच हे पदार्थ बनवण्याची पद्धत देखील खूप वेगळी आहे याच संबंधी आपण आज पाहणार आहोत
पनीर आणि टोफू ची निर्मिती आणि उगम स्थान
टोफू, ज्याला सोयाबीन चे दही असे देखील म्हणले जाते टोफू या पदार्थाची ची मूळे तस पहिला गेले तर आपल्याला चीन मध्ये साफडतात ती देखील २००० वर्षांपूर्वीची आहेत म्हणजे हा पदार्थ चीन मध्ये २००० हजार वर्षा पासून खात आहेत हा पदार्थ सोयाबीन च्या दूधा पासून बनवला जातो ज्याला सोया मिल्क असे म्हणले जाते हे सोया मिल्क पहिले गोठवून घेतले जाते आणि नंतर याचे छोटे छोटे ब्लॉक केले जातात या प्रक्रियेमध्ये पहिले सोयाबीन भिजवले जाते आणि नंतर बारीक तुकडे करून ते पाण्यात उकळले जाते मग त्यापासून सोया मिल्क तयार होते मग त्या मध्ये कॅल्शियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम क्लोराईड सारख्या पदार्थांचा वापर करून गोठवले जाते
दुसरीकडे, पनीर च्या बाबतीत बोलायचे जाले तर या पदार्थाला आपण ताजे चीज म्हणू शकतो भारतात पनीर हे खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. पनीर हे पारंपारिकपणे लिंबाचा रस, व्हिनेगर किंवा दही या पदार्थाना गरम केलेल्या दुधा मध्ये टाकले जाते आणि नंतर या पासून तयार जालेले दही गाळून घेतले जाते आणि हे दही एक वजनदार वस्तु खाली ठेवले जाते व नंतर या चे छोटे छोटे चौकोनी ब्लॉक तयार केले जातात.
टोफू आणि पनीर मधील पोषकतत्व पाहुयात
टोफू आणि पनीर हे दोन्ही प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहेत,ज्यामुळे हे पदार्थ शाकाहारी लोकांसाठी लोकप्रिय पर्याय बनले आहेत तरी देखील हे दोन्ही पदार्थ हे त्यांच्या पौष्टिक पातळी वरती भिन्न आहेत. पनीरच्या तुलनेत टोफूमध्ये फॅट आणि कॅलरीज कमी असतात, जे लोक जिम आणि व्यायाम करतात त्यांच्या साठी टोफू एक उत्तम पर्याय असू शकतो याव्यतिरिक्त, टोफू हा कोलेस्टेरॉल-मुक्त आहे तसेच यात शरीराला लागणारे सर्व नऊ आवश्यक अमीनो ऍसिड आहेत ज्यामुळे हे एक संपूर्ण अन्न बनत त्याच बरोबर टोफू मध्ये खूप प्रमाणात आपल्याला iron (लोह),कॅल्शियम आणि इतर खनिजे देखील पाहिला मिळतात दुसरीकडे, पनीरमध्ये दुधाचे प्रमाण जास्त असल्याने त्यात फॅट आणि कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. पनीर हे देखील कॅल्शियम आणि फॉस्फरसचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, हाडांचे आरोग्य राखण्यासाठी पनीर खाणे आवश्यक आहे.
टोफू आणि पनीर ची चव आणि रचना
टोफू आणि पनीरमधील प्राथमिक फरकांपैकी एक त्यांच्या रचना आणि चव देखील आहे. टोफूमध्ये एक मऊ, रेशमी रचना आहे त्यामूळे टोफू ची चव ही सूक्ष्म आणि माइल्ड स्वरूपाची आहे जी चव डिशमधील इतर पदार्थांचा स्वाद सहजपणे शोषून घेते. टोफू च्या मसालेदार आणि गोड चव मूळे आपण ते सहज भाजी मध्ये वापरू शकतो
याउलट पनीर आहे पनीर ही एक सौम्य आणि मलईदार चवी सह टणक रचना असलेला पदार्थ आहे. पनीर ही शिजल्या नंतर ते आपला आकार बदलत नाही आणि पदार्थाला चटकदार बनवत . पनीर टोफू सारखे सहजतेने चव शोषून घेत नाही परंतु ते भाजी मध्ये एक मालाईदार पणा सोडत ज्या मूळे भाजी आणखीन चवदार बनते.
टोफू आणि पनीर यांचे आरोग्य विषयक फायदे
जेव्हा आरोग्याचा विचार केला जातो, तेव्हा टोफू आणि पनीर दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत.टोफू मध्ये कमी प्रमाणात चरबी(fat) आणि कॅलरी असतात तसेच टोफू मध्ये कोलेस्ट्रॉल ही कमी प्रमाणात असते त्यामूळे टोफूला आरोग्यदायी पर्याय मानले जाते. टोफू हे एक वनस्पती-आधारित पदार्थ आहे आणि आवश्यक पोषक तत्वांचा देखील एक चांगला स्त्रोत आहे, ज्यामुळे ते संतुलित आहारासाठी एक उत्तम पदार्थ मानला जातो. पनीर च्या बाबतीत बोलायचे झाले तर पनीर पौष्टिक असले तरी ते दुग्धजन्य पदार्थां पासून बनवले जाते त्या मूळे त्यात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात असते. त्यामूळे हे कॅल्शियम सारखे आवश्यक घटक ही शरीराला पुरवत असते पनीर हे ज्या लोकाना लैक्टोज चा प्रॉब्लेम आहे अश्या लोकांसाठी अयोग्य मानले जाते तरी देखील संतुलित आहाराचा भाग म्हणून पनीरचा समावेश होऊ शाकतो.
शेवटी, टोफू आणि पनीर ही दोन्ही शाकाहारी लोकांसाठी प्रोटिन चा एक उत्तम स्त्रोत मानला जातो जरी दोन्ही पदार्थ वेगळे असले तरी त्या पासून एक मसालेदार आणि उत्तम भाजी बनू शकते त्यामूळे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही निवडू शकता