benefits of buttermilk : ताक पिल्याने काय फायदा होतो
ताक आंबट आणि मलईयुक्त पदार्थ आहे जो की दुधा पासून बनवला जातो . ताक हे भारतीय खाद्य संस्कृतीचा एक महत्व पूर्ण पदार्थ राहीला आहे शतकानुशतके ताक हे त्याच्या आंबट गॉड चवसाठीच नव्हे तर त्याच्या असंख्य आरोग्य संबंधीत फायद्यांसाठी देखील लोकप्रिय राहिले आहे. ताक हे सहसा गरमीत ताजेतवाने करणारे पेय म्हणून लोकप्रिय आहे त्याच बरोबर ताक हे भारतात जेवण बनव्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते त्या मूळे या पदार्थाला भारतात एक महत्वाचे स्थान आहे असे आपण म्हणू शकतो याच पदार्था बदल आपण आज थोडी माहिती घेणार आहोत
तर ताक बनते कशे या बदल थोडी माहिती पाहूयात
पारंपारिकपणे ताक हे दहया पासून बनवले जाते त्या मध्ये पहिले दुध गरम केले जाते आणि नंतर लिंबू किवा विरजण चा वापर करून दुधा पासून दही बनवले जाते या प्रकिरे मूळे दहयात लैक्टिक ऍसिड बनले जाते ज्या मूळे दही आंबट व गोड बनते आणि या दहयला फेटले जाते व लोणी बाहेर काढले जाते या दरम्यान जे मलई युक्त पानी राहते त्याला ताक अशे म्हणतात या ताकाचे खूप मोठे आशे फायदे आपल्याला पाहिला मिळतात ते आपण पुढे पाहुयात
ताकाचे आरोग्य विषयक फायदे:
ताक पचन क्रिया सुधरवण्यात मदत करते : ताक हे प्रमुख्या ने पचन क्रिया सुधरवण्यात मदत करते ताका मध्ये प्रोबायोटिक्सची मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात जे की पचन क्रिया सुधरवण्यात मोठ्या प्रमाणात मदत करतात ताका मूळे पोट फुगणे तसेच गॅस तयार होणे या सारख्या समस्यान पासून आराम मिळतो .
हाडांचे आरोग्य: ताकातील कॅल्शियम आणि फॉस्फरस या सारखे घटक हाड मजबूत आणि निरोगी राखण्यासाठी मदत करतात ताकाचे नियमित सेवन केल्याने हाडांची जाडी वाढू शकते त्याच बरोबर ताक हे कॅल्शियम युक्त असल्या मूळे शरीराचे व हाडाचे आयुष्य उत्तम राहते
हायड्रेशन: बऱ्याचदा खूप साऱ्या लोकाना पानी कमी प्यायाची सवय असते त्या मूळे शरीरात पाण्याचे प्रमाण खूप कमी होते अश्या वेळेस ताक हे प्रमुख भूमिका बजावते आणि शरीरात पाण्याची क्षमता टिकवून ठेवायला मदत करते उच्च पाण्याचे प्रमाण आणि पोटॅशियम सारख्या इलेक्ट्रोलाइट्ससह, ताक हे हायड्रेशन पातळी राखण्यासाठी एक प्रभावी पेय ठरते
वजन कमी करण्यात मदत करते : मलईयुक्त पेय असूनही, संपूर्ण दुधाच्या तुलनेत ताक तुलनेने कमी कॅलरी आणि कमी फॅट ने भरलेले असते.ज्यामुळे ते एक अयोग्यदायी पेय म्हणून चागला पर्याय बनू शकते त्याच बरोबर ताकाचा नियमित जेवणात उपयोग केल्या ने वजन कमी करण्यात मदत होऊ शकते
ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यात मदत करते : पोटॅशियम हे ताकामध्ये मुबलक प्रमाणात असलेले एक खनिज आहे जेकी आपला ब्लड प्रेशर कमी ठेवण्यास मदत करते त्या मूळे ज्या लोकाना ब्लड प्रेशर चा त्रास आहे अश्या लोकानी ताक ही नियमित पिले पाहिजे किवा त्याचा आहारात समावेश केला पाहिजे
रोगप्रतिकारक शक्ति वाढवायला मदत करते : ताकमध्ये आढळणारे प्रोबायोटिक्स पोषक द्रव्ये शोषून घेण्याची आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात मदत करत असतात त्याच बरोबर आतड्याची पचन क्षमता वाढवून रोगप्रतिकारक शक्ति बळकट करतात आणि उत्तम आरोग्य प्रदान करते
त्वचेचे आरोग्य सुधारवण्यात मदत करते: ताकाचे नियमित सेवन केल्या ने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते ताक हे त्वचेला हायड्रेट ठेवायला मदत करते ज्या मूळे त्वचेचे आरोग्य सुधरण्यास मदत होते
थोडक्यात ताक ही एक उत्तम पदार्थ आहे जो की आपल्या रोजच्या आहारात असला पाहिजे जेणे करून आपण आपले आरोग्य उत्तम पद्धतीने राखू शकतो