बेरोजगार लोकांसाठी खुशखबर SSC ने काढली सर्वात मोठी भरती
कर्मचारी निवड आयोग (SSC) दरवर्षी संयुक्त पदवीधर स्तर (CGL) परीक्षा आयोजित करतो. या परीक्षेद्वारे विविध केंद्र सरकारी विभागांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाते. २०२४ साली होणाऱ्या CGL परीक्षेत अनेक महत्त्वपूर्ण पदांसाठी भरती केली जाणार आहे. या साठीची जाहिरात ssc ने आपल्या संकेतस्थळा वरती प्रकाशित केली आहे या द्वारे ssc या वर्षी 17000 जागांसाठी पद भारती करणार आहे या साठीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे
SSC CGL २०२४ मध्ये भरले जाणार १७००० रिक्त पदे
SSC CGL २०२४ साठी रिक्त जागांची अधिकृत अधिसूचना जाहीर झालेली आहे या आंतर्गत या वर्षी १७००० रिक्त पदे भरली जाणार आहेत. SSC CGL ही परीक्षा विविध श्रेणींतील पदांसाठी घेतली जाते. त्यामध्ये काही प्रमुख पदे पुढीलप्रमाणे आहेत:
1.सहायक लेखापाल (Assistant Audit Officer)
2.सहायक लेखाधिकारी (Assistant Accounts Officer)
3.केंद्रीय सचिवालय सेवा (Central Secretariat Service)
4.आयकर निरीक्षक (Income Tax Inspector)
5.केंद्रीय उत्पाद शुल्क निरीक्षक (Central Excise Inspector)
6.Preventive Officer
7.सहायक (Assistant)
8.आर्थिक व्यवहार सहायक (Assistant in External Affairs)
9.सांख्यिकी अन्वेषक (Statistical Investigator)
10.लेखा अधिकारी (Accountant/ Junior Accountant)
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि पात्रता
CGL परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना SSC च्या अधिकृत वेबसाइटवर (ssc.nic.in) जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. अर्ज भरण्या पूर्वी उमेदवारांनी खालील गोष्टींची पूर्तता केली पाहिजे:
1.शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
2.वयोमर्यादा:CGL परीक्षेतील विविध पदांसाठी वयोमर्यादा भिन्न आहे. सामान्यत: १८ ते ३२ वर्षे वयोमर्यादा असते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन निर्णया नुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाते.
3.शारीरिक क्षमता: काही पदांसाठी उमेदवारांनी शारीरिक क्षमतेची पूर्तता करावी लागते.
SSC CGL परीक्षेचे स्वरूप काय असते
SSC CGL परीक्षा दोन टप्प्यात आयोजित केली जाते:
- Tier-I: ही संगणक आधारित परीक्षा आहे. यात सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशास्त्र, सामान्य अभ्यास , गणित , आणि इंग्रजी भाषा अशा विषयांचा समावेश असतो.
- Tier-II: ही देखील संगणक आधारित परीक्षा आहे. यात इंग्रजी भाषा आणि गणिताचा समावेश असतो.
२०१९, २०२०, २०२१ आणि २०२२ साली SSC ने मोठ्या प्रमाणात उमेदवारांची निवड केली होती . त्यात २०१९ मध्ये ८,५५२ जागा, २०२० मध्ये ६,५०६ जागा, २०२१ मध्ये ७,०३५ जागा आणि २०२२ मध्ये ८,०२३ जागा भरण्यात आल्या होत्या. या वेळेस मात्र ssc ने भरपूर जागा काढल्या आहेत ही एक उत्तम संधी म्हणून आपण पाहू शकतो
SSC CGL परीक्षा तयारी कशी करावी?
१.अभ्यासाची योजना: नियमित अभ्यासाची योजना तयार करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विषयासाठी वेळ विभाजन करणे आणि त्यानुसार अध्ययन करणे गरजेचे आहे
२.मागील वर्षांची प्रश्नपत्रिका: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविणे देखील महत्वाचे आहे यामुळे परीक्षेच्या पद्धतीची चांगली ओळख होते
३. मॉक टेस्ट: मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे. यामुळे वेळचे नियोजन करण्यात मदत होते
SSC CGL २०२४ ही परीक्षा सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. २०२४ साली होणाऱ्या SSC CGL परीक्षेत भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि या जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी तयारीला लागले पाहिजे.