भारतीय टीम सोबतच नरेंद्र मोदी च देखील कौतुक का होत आहे
भारतीय क्रिकेट संघ सध्या खूप प्रशंसा मिळवत आहे त्यामध्ये अशी एक घटना घडली की भारतीय क्रिकेट संघा सोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील खूप मोठ्या प्रमाणात मीडिया मध्ये प्रशंसा होत आहे. जाणून घेऊयात की असे काय घडले जेणे करून भारतीय प्रधानमंत्री मीडिया मध्ये ट्रेंड करत आहेत.
तर आपल्या सर्वाना माहितीच आहे की भारतीय क्रिकेट संघ हा या वर्षीचा t२० वर्ल्ड कप विजेता संघ आहे हा आनंदाचा क्षण भारतीय क्रिकेट प्रेमीना तब्बल १३ वर्षानी अनुभवायला मिळात आहे. तर २०२४ च्या t२० वर्ल्ड कप चा फायनल सामान्य भारत आणि साऊथ आफ्रिका या दोन संघात रंगला होता या मॅच मध्ये भारतीय संघाने फायनल मॅच मध्ये साऊथ आफ्रिकेचा पराभव करून जेते पद आपल्या नावा वरती करून घेतले आणि सर्व भारतीयाना एक आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला
या मुळलेच भारतीय संघाची मायदेशी परतण्याची वाट सर्वच भारतीय पाहत होते. झाले ही तसेच भारतीय संघ दिल्ली विमानतळावरती येताच क्रिकेट प्रेमिनी जबरदस्त गर्दी केली होती पान भारतीय संघ हा सर्वात पहिले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेला आणि याठिकाणी जे घडले त्या नंतर सर्वच थरातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले जाऊ लागले तर झाले असे की क्रिकेट टीम सोबत फोटो काढत असताना नरेंद्र मोदी नी विश्वचषकाला हात न लावता फोटो काढला आणि या गोष्टीची चर्चा सर्वच माध्यमात होऊ लागली.