गूगल पिक्सल ९ सीरीज मोबाइल चे भन्नाट features झाले लिक
गूगल पिक्सल ९ सीरीज मोबाइल चे खूप सारे features लिक झाले आहेत यामुळेच या नवीन स्मार्टफोन सीरीजने मोबाइल प्रेमींमध्ये उत्साह निर्माण केला आहे. गूगल पिक्सल या फोन च्या सिरीज ने नेहमीच उत्कृष्ट कॅमेरा ग्राहकांसाठी प्रदान केली आहे, या मुळेच पिक्सल ९ सीरीज मध्ये एक चागला कॅमेरा आपल्याला पाहिला मिळणार आहे चला तर मग, जाणून घेऊया या नवीन स्मार्टफोन सीरीजच्या कॅमेरा फीचर्सविषयी सविस्तर माहिती.
गूगल पिक्सल ९ सीरीजमध्ये नवीन आणि सुधारित कॅमेरा प्रणाली आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रमुख सेन्सर आहे, जो अधिक स्पष्ट आणि नीट फोटो घेण्यासाठी सक्षम आहे. नवीन सेन्सरच्या सहाय्याने कमी प्रकाशातही उत्तम कॅमेरा quality मिळेल, ज्यामुळे रात्रीचे फोटो अधिक आकर्षक निघतील ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) या मूळे स्पष्ट आणि स्थिर फोटो निघतील
अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स
गूगल पिक्सल ९ सीरीजमध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स देण्यात आल्या आहेत यामुळे कॅमेरा अधिक वाइड अॅंगल ने फोटो घेऊ शकतो ज्यामुळे ग्रुप फोटो अधिक प्रभावीपणे काढत येईल . अल्ट्रा-वाइड अँगल लेन्समुळे वापरकर्त्यांना नवीन आणि वाइड फोटो काढता येतील
टेलीफोटो लेन्स
नवीन पिक्सल ९ सीरीजमध्ये ४८ मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आहे. यामुळे वापरकर्त्यांना लांबच्या वस्तूंचे स्पष्ट फोटो घेता येतील. टेलीफोटो लेन्समध्ये हायब्रिड झूम आणि ऑप्टिकल झूमचा समावेश आहे, ज्यामुळे लांबच्या वस्तूचा झूम करून फोटो काढत येईल
top चे कॅमेरा सॉफ्टवेअर
गूगल पिक्सल ९ सीरीजमध्ये कॅमेराच्या सॉफ्टवेअरमध्ये बरेच सुधार केले आहेत. नवीन AI-आधारित फीचर्समुळे फोटो अधिक चंगाळे निघतील पोर्ट्रेट मोड, नाईट साईट, आणि सुपर रेस झूम सारख्या फेयातुरेस चा समावेश यात करण्यात आला आहे
व्हिडिओ रेकॉर्डिंग
गूगल पिक्सल ९ सीरीजच्या कॅमेरा सिस्टममध्ये उत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग क्षमताही आहे. 4K रेकॉर्डिंगसह ६० FPS पर्यंतचा व्हिडिओ रेकॉर्डिंग चे पर्याय उपलब्ध आहेत . यामुळे व्हिडिओमध्ये अधिक स्पष्टता मिळेल. स्लो मोशन आणि टाईम-लॅप्स सारखे फीचर्स देखील यामध्ये उपलब्ध असतील, ज्यामुळे बेस्ट विडियो काढता येतील.
सेल्फी कॅमेरा
गूगल पिक्सल ९ सीरीजमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यामुळे बीट क्वालिटी असलेल्या सेल्फी घेता येतील. फ्रंट कॅमेऱ्यामध्ये पोर्ट्रेट मोड आणि नाईट साईट सारख्या फीचर्सचा समावेश असेल, ज्यामुळे कमी प्रकाशातही उत्कृष्ट सेल्फी घेता येतील.
कॅमेरा अॅप
गूगल पिक्सल ९ सीरीजमध्ये कॅमेरा अॅपमध्ये बरेच सुधार केले आहेत. नवीन यूजर इंटरफेसमुळे वापरकर्त्यांना कॅमेरा सेटिंग्ज सहजतेने समजतील. नवीन फीचर्सचा वापर करून विविध प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ घेता येतील.
गूगल पिक्सल ९ सीरीजचे कॅमेरा फीचर्स तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल आहेत. नवीन कॅमेरा सिस्टममुळे वापरकर्त्यांना उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ घेण्याची सुविधा मिळेल. या नवीन सीरीजचे लॉन्च ऑगस्टमध्ये होणार आहे,त्यावेळी या सर्व फीचर्सची सविस्तर माहिती मिळेल. गूगल पिक्सल ९ सीरीजने पुन्हा एकदा स्मार्टफोन फोटोग्राफीच्या दुनियेत आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.