Maharashtra weather update : पुणे कोल्हापूर मुंबई पावसाचा हाहाकार वाचा सविस्तर
मुसळधार पावसामुळे पुणे आणि आसपासच्या भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील विविध भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडथळे येत असून, स्थानिक प्रशासनाने पाणी काढण्यासाठी यंत्रणा तैनात केली आहे.
त्याच बरोबर कोल्हापुरात देखील पुराचा धोका वाढत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी धोकादायक स्तरावर पोहोचली आहे त्यामूळे नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे यामूळे प्रशासनाने या भागातील लोकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे आणि काही ठिकाणी रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी सुरू आहे.
याचबरोबर कोल्हापूरचा ताम्हिणी घाट वाहतुकी साठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. रस्ते बंद असल्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील इतर भागातही पावसाचे तडाखे बसत आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या, ओढे आणि धरण ओसंडून वाहत आहेत स्थानिक प्रशासनाने या भागात हाय अलर्ट जारी केला आहे आणि नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईतही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील काही भागांत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे त्याच बरोबर बेस्टच्या बसेस आणि लोकल ट्रेनच्या सेवेत व्यत्यय येत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असल्याशिवाय बाहेर जाणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत पावसामुळे शेतीलाही मोठा फटका बसला आहे. पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. राज्य सरकारने पावसामुळे बाधित झालेल्या भागांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.
पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने विविध यंत्रणांना सतर्क केले आहे. पूरग्रस्त भागांत एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. स्थानिक प्रशासनाने पूरग्रस्त भागांमध्ये आवश्यक ती मदत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.