घरगुती उपायांनी मिळवा नितळ आणि चमकदार त्वचा – जाणून घ्या कसे!
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत, वेळेअभावी अनेकजण त्वचेची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. तरीसुद्धा, महागड्या क्रीम किवा इतर गोष्टींचा वापर न करता घरगुती उपायांद्वारे तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. हे उपाय नैसर्गिक असल्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात आणि ही उपाय परिणामकारक देखील आहेत चला तर मग, पाहूया काही उत्तम घरगुती उपचार जे तुम्हाला एक सुंदर त्वचा देऊ शकतात
१. हळदीचा वापर
हळद ही एक अतिशय गुणकारी औषधी वनस्पती आहे. तिच्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तुमची त्वचा उजळवण्यास मदत करतात त्याच बरोबर हळद ही त्वचेला गुणकारक मानली जाते
- १ चमचा हळद पावडरमध्ये २ चमचे बेसन आणि दही घालून पेस्ट बनवा.
- ही पेस्ट चेहऱ्यावर लावून २० मिनिटे ठेवा.
- नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
२. मधाचा वापर
मधात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे त्वचेच्या खोलवर पोषण देतात.
- १ चमचा मध थेट चेहऱ्यावर लावा.
- १५ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.
- आठवड्यातून २-३ वेळा हा उपाय करा.
३. काकडीचा वापर
काकडी ही त्वचा मऊ आणि कोमल करण्यात मदत करते त्याच बरोबर काकडी मूळे त्वचेला गारवा मिळतो
- काकडीचे पातळ काप करून चेहऱ्यावर लावा.
- १५-२० मिनिटांनी काप काढून चेहरा थंड पाण्याने धुवा.
४. दही आणि बेसन
दही आणि बेसन हे त्वचेची चमक वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. दह्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते
- २ चमचे बेसन आणि २ चमचे दही एकत्र करून पेस्ट बनवा.
- ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटे ठेवा.
- नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
५. आलं आणि लिंबू रस
आलं आणि लिंबू रस यांच्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेचे संक्रमण कमी करण्यास मदत करतात
- आलं किसून त्याचा रस काढा.
- त्यात १ चमचा लिंबू रस घालून चेहऱ्यावर लावा.
- १०-१५ मिनिटांनी चेहरा धुवा.
६. पपईचा वापर करू शकता
पपईमध्ये पॅपेन एनझाइम असते, जे त्वचेच्या मृत पेशींना काढून टाकते आणि त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करते
- पपईचे तुकडे करून त्यांचा बारीक कीस बनवा.
- हा बारीक कीस चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटे ठेवा.
- नंतर चेहरा धुवा.
७. गुलाबजलाचा वापर
गुलाबजल त्वचेला ताजेतवाने ठेवते आणि त्वचेचा रंग उजळवण्यात मदत करते
- गुलाबजल थेट चेहऱ्यावर स्प्रे करा किंवा कापसाच्या बोळ्याने लावा.
- रोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा.
हे घरगुती उपचार त्वचेच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. यांचा नियमित वापर केल्यास त्वचा ताजेतवानी , निरोगी आणि चमकदार राहील.