Railway NTPC Bharti 2024 : भारतीय रेल्वेत नॉन टेक्निकल पदाची सर्वात मोठी भरती
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने नुकतीच नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. रेल्वे एनटीपीसी भरती २०२४ ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे ज्यामध्ये देशभरातील उमेदवारांना विविध पदांसाठी अर्ज करण्याची संधी आहे. तर रेल्वे एनटीपीसी भरती २०२४ बद्दल सर्व आवश्यक माहिती खाली दिली आहे
रेल्वे एनटीपीसी भरती अंतर्गत, विविध नॉन-टेक्निकल पदांसाठी भरती केली जाते. यात मुख्यतः पुढील पदांचा समावेश आहे:
- ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट
- अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट
- ज्युनिअर टाइम कीपर
- ट्रेन क्लर्क
- कमर्शियल कम टिकेट क्लर्क
- ट्रॅफिक असिस्टंट
- गुड्स गार्ड
- सीनियर कमर्शियल कम टिकेट क्लर्क
- सीनियर क्लर्क कम टायपिस्ट
- सीनियर टाइम कीपर
- कमर्शियल अप्रेंटिस
- स्टेशन मास्टर
भरती साठी पात्रता निकष काय आहे
रेल्वे एनटीपीसी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत:
शैक्षणिक पात्रता: विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. काही पदांसाठी किमान बारावी पास असणे आवश्यक आहे, तर काही पदांसाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा: उमेदवारांचे वय १८ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
राष्ट्रीयत्व : उमेदवार भारतीय नागरिक असावा.
अर्ज प्रक्रिया काय आहे
रेल्वे एनटीपीसी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते. उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी:(अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होतील )
वैयक्तिक माहिती: उमेदवारांचे नाव, वय, पत्ता इत्यादी माहिती व्यवस्थित भरावी.
शैक्षणिक माहिती: शैक्षणिक पात्रता संबंधित माहिती व्यवस्थित भरावी.
छायाचित्र आणि स्वाक्षरी : योग्य प्रमाणात छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्कात सवलत देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
रेल्वे एनटीपीसी भरतीसाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत केली जाते:
प्राथमिक परीक्षा (CBT-1): हा पहिला टप्पा आहे ज्यामध्ये जनरल अॅवेरनेस, गणित आणि सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती यावर आधारित प्रश्न असतात.
मुख्य परीक्षा (CBT-2): हा दुसरा टप्पा आहे ज्यामध्ये अधिक सखोल आणि विषयविशेष प्रश्न असतात.
टायपिंग स्किल टेस्ट : कंम्प्युटर आधारित अॅप्टिट्यूड टेस्ट : काही पदांसाठी आवश्यक असलेल्या टायपिंग स्किल किंवा कंम्प्युटर आधारित अॅप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते.
दस्तऐवज पडताळणी: उमेदवारांनी त्यांच्या सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करावी लागते.