Swiggy IPO in marathi : ५,००० कर्मचारी होणार करोडपती, भारतीय स्टार्टअप क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी
भारताच्या फूड डिलिव्हरी उद्योगातील आघाडीची कंपनी स्विग्गी (Swiggy) लवकरच आपल्या आयपीओ (IPO) च्या माध्यमातून मोठी कामगिरी करणार आहे. या आयपीओमुळे अंदाजे ५,००० कर्मचारी करोडपती बनतील, ज्यामुळे एकूण ₹९,००० कोटींची संपत्ती त्यांच्या हाती येईल. स्विग्गीच्या या ipo ने भारतीय स्टार्टअप जगतात नव्या संधी आणि प्रेरणांचा मार्ग खुला केला आहे.
ESOP म्हणजे काय आणि त्याचा फायदा
Swiggy च्या आयपीओमधून कर्मचारी ESOP (Employee Stock Ownership Plan) चा लाभ घेऊ शकतील. ESOP म्हणजे कर्मचारी आपल्या पगाराच्या च्या बदल्यात काही शेअर कंपनी चे घेत असतता ज्या मूळे जेव्हा जेव्हा कंपनी ची किमत जागतिक बाजारात वाढते त्या वेळेस आपोआप कर्मचाऱ्याच्या शेअर ची किमत देखील वाढत असते. आयपीओ यशस्वी झाल्यास कर्मचारी त्यांचे शेअर्स विकून आर्थिक फायदा मिळवू शकतात. swiggy च्या IPO मुळे कर्मचारी त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळवून आर्थिक स्थैर्य साधू शकतील.
swiggy ची स्थापना आणि त्याची यशस्वी वाटचाल
२०१४ मध्ये बेंगळुरूमध्ये Swiggy ची स्थापना झाली आणि काहीच वर्षांत ती भारताच्या प्रमुख फूड डिलिव्हरी सेवांपैकी एक बनली. झोमॅटो सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करत असताना, स्विग्गीने आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे. IPO मुळे Swiggy भारतीय मार्केट मध्ये मोदहीं प्रमाणात विस्तार करेल आणि येत्या काळात ही कंपनी भारताच्या वर्ग 3 आणि 4 मध्ये आपला व्यवसायचा विस्तार करेल.सुमारे ११,३०० कोटींच्या या IPO मुळे Swiggy भारतीय बाजारात अजूनच बळकट बनेल.
swiggy IPO मुळे कर्मचारीवर्गाचा फायदा
Swiggy च्या IPO मुळे ५,००० कर्मचाऱ्याना करोडपती होण्याची संधी आहे .त्याचबरोबर एकूण ९,००० कोटींचा आर्थिक लाभ कर्मचारीवर्गाला मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे भविष्य उजवळ होणार आहे. भारतीय स्टार्टअप क्षेत्रात अशा मोठ्या IPO मुळे कर्मचार्यांसाठी एक नवीन दिशा निर्माण होत आहे.
भारतीय स्टार्टअप क्षेत्रासाठी प्रेरणादायक पाऊल
Swiggy IPO च्या यशामुळे भारतीय स्टार्टअप्ससाठी एक नवीन प्रेरणा मिळाली आहे. या IPO मुळे भविष्यात अधिकाधिक स्टार्टअप्ससाठी आपले शेअर्स बाजारात आणण्याचा मार्ग खुला होईल. स्विग्गीने आपल्या व्यवसायाची मजबूत पायाभरणी केल्यामुळे, स्टार्टअप्सना त्यांच्या कर्मचार्यांसाठी आर्थिक लाभ तयार करण्याची संधी मिळेल.