kalki 2898 AD movie :लोकांना येड लावणारा ‘कल्कि २८९८ एडी’ सिनेमा
भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये दरवर्षी अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित होतात, पण काही चित्रपट असे असतात जे प्रेक्षकांच्या मनावर गारुड करतात. २०२४ मध्ये असाच एक नविन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्याचे नाव आहे ‘कल्कि २८९८ एडी’ हा एक असा चित्रपट आहे ज्याने भारतीय सिनेप्रेमींना भारावून टाकले आहे. हा चित्रपट कथा,तंत्रज्ञान आणि अभिनयाच्या बाबतीत खूपच उल्लेखनीय ठरला आहे.या फिल्म कडून लोकाना खूप अपेक्षा आहेत कारण साऊथ चा सुपर स्टार प्रभास पुन्हा comeback करत आहे
फिल्म ची स्टोरी काय आहे
‘कल्कि २८९८ एडी’ हा एक वैज्ञानिक दृष्टिकोण असलेला ऍक्शन-थ्रिलर चित्रपट आहे.या चित्रपटाची कथा भविष्यात म्हणजे २८९८ साली घडते. मानवजातीने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक प्रगती केली आहे, पण या प्रगतीमुळे मानवी मूल्ये आणि नैतिकता कुठे तरी हरवली आहे अशा परिस्थितीत, पृथ्वीच्या सुरक्षिततेसाठी एक योद्धा उभा राहतो, ज्याचे नाव कल्कि आहे. प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णिलेल्या कल्कि अवतारा पासून या कॅरक्टर ची निवड केली आहे. याच बेस वरती या फिल्म ची कथा पुढे चालू राहते
कल्की मध्ये ग्राफिक्स टेक्नॉलॉजी चा उपयोग केला आहे
‘कल्कि २८९८ एडी’ चित्रपटाच्या सीन ची चर्चा केल्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होणार नाही. चित्रपटात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीन शूट केले आहेत या मध्ये ३D इफेक्ट देण्यात आले आहेत ज्या मूळे हा चित्रपट पाहताना प्रेक्षकना एक वेगळाच अनुभव पाहिला मिळणार आहे त्याच बरोबर या मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे ग्राफिक्स. या चित्रपटात आरिजिनल ग्राफिक्स देण्यात आले आहेत. ग्राफिक्स चा वापर चित्रपटात भविष्यातील जगाची भव्यता आणि प्रगती दर्शवण्यासाठी करण्यात आला आहे. विशेषतः,या चित्रपटातील अंतराळ युद्धाच्या दृश्यांनी प्रेक्षकांना थक्क करून सोडले आहे.
कल्की मधील अभिनेते आणि स्टारकास्ट
चित्रपटात मुख्य भूमिकेत साऊथ चा सुपरस्टार अभिनेता प्रभास आहे, ज्यांनी कल्कि या पात्राला रोल केला आहे. त्याच्यासोबतच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रभासने आपल्या दमदार अभिनयाने आणि शारीरिक तंदुरुस्तीने कल्कि या पात्राची उंची वाढवली आहे. दीपिकाने आपल्या भूमिकेतून एक सशक्त आणि प्रभावशाली स्त्रीचे पात्र उभे केले आहे, तर अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटाला एक वेगळाच आकार दिला आहे.
कल्की मधील संगीत आणि पार्श्वसंगीत
चित्रपटातील संगीत हा देखील एक महत्वाचा घटक असतो . या चित्रपटातील संगीताने प्रेक्षकांना भारावून टाकले आहे. या चित्रपटाचे सुरुवातीचे संगीत उल्लेखनीय आहे, जे चित्रपटातील दृश्यांना अधिक प्रभावी पने सादर करते मराठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले गाणी चित्रपटाच्या भावनात्मक आणि नाट्यात्मक क्षणांना अधिक प्रभावी बनवतात.
कल्की चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन
चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी अत्यंत कौशल्याने केले आहे. त्यांच्या दिग्दर्शनात भविष्यकालीन जगाचे चित्रण, तंत्रज्ञानाचा वापर, आणि कथा सांगण्याची शैली अत्यंत प्रभावी आहे. चित्रपटाच्या लेखनात देखील त्यांचे कसब दिसून येते. फिल्म ची रचना आणि पात्रांच्या संवादांनी चित्रपटाला एक वेगळाच आयाम दिला आहे.
प्रेक्षकांची प्रतिक्रिया
प्रेक्षकांनी ‘कल्कि २८९८ एडी’ चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाची कथा, अभिनय आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाची प्रशंसा केली आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले असून, सोशल मीडिया वरती कल्की च्या विविध पैलूंवर चर्चा सुरू आहे.
‘कल्कि २८९८ एडी’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील एक नवा मापदंड ठरला शकतो चित्रपटातील कथा, तंत्रज्ञान, अभिनय, आणि सामाजिक संदेशामुळे तो एक उल्लेखनीय चित्रपट बनू शकतो . प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे चित्रपटाची यशस्वीता अधोरेखित होते. भविष्याच्या जगात न्याय, धर्म आणि मानवतेचा संदेश देणारा ‘कल्कि २८९८ एडी’ चित्रपट रोमॅंटिक चित्रपटांच्या दुनियेत एक नवा अध्याय लिहू शकतो